सामाजिक उत्तरदायित्व जपले अन् सहा मंगल परिणय लावले   

HNG20A00077
HNG20A00077

हिंगोली ः येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक सामाजिक चळवळीचे केंद्र बनले आहे. या स्मारकामध्ये नेहमीच सामाजिक उपक्रम चालू असतात. यासोबतच लॉकडाउनच्या काळामध्ये या स्मारकामध्ये तब्बल सहा जणांचे एकदम साध्या पद्धतीने मंगल परिणय सोहळे पार पडले. या कामासाठी स्मारक समितीचे अध्यक्ष दिवाकर माने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संपूर्ण व्यवस्था, नियोजन करून हे कार्यक्रम यशस्वी केले आहेत. 

हिंगोली शहरात दसरा मैदानावर मोक्याच्या ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक आहे. या स्मारकावर दर्शनी भागात मोठे ‘जय भीम’ असे लिहिलेले असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला ही वास्तू आंबेडकरी समाजाचे असल्याचे स्पष्ट जाणवते. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला ही वास्तू आंबेडकरी समाजाची असल्याचे स्पष्ट जाणवते. त्यामुळे आपोआपच या स्मारकाकडे आंबेडकरी जनता आकर्षित होत असते. परिणामी या ठिकाणी नेहमीच नागरिकांची वर्दळ असते. परंतू, लॉकडाउनच्या काळात हे स्मारक पूर्णतः बंद होते. 

मंगल परिणयसाठी दहा व्यक्तींनाच परवानगी 
प्रशासनाने नियमांचे पालन करून लग्नविधी पार पाडण्यासाठी परवानगी दिल्यानंतर या ठिकाणी तब्बल सहा जणांचे मंगल परिणय पार पडले आहेत. मंगल परिणयसाठी स्मारक समितीचे अध्यक्ष दिवाकर माने यांनी घालून दिलेल्या अटी व शर्तींचे पालन करणाऱ्या लोकांनाच याठिकाणी मंगल परिणय लावण्यासाठी परवानगी देण्यात आली. त्यानुसार मंगल परिणय करण्यासाठी येणारे नवरी आणि नवरदेव यांच्याकडील प्रत्येकी पाच अशा दहा व्यक्तींनाच परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार हे मंगल परिणय पार पडले आहेत. 

सोमवारी पार पडला एक मंगल परिणय
सोमवारी (ता.१३) जुलैला सुद्धा सकाळी नऊ वाजता असाच एक मंगल परिणय पार पडला. हा विधी सुद्धा अटी आणि नियमांचे पालन करूनच पार पडला. या वेळी उपासक, अनिल देवराव फले यांची सुकन्या आयु. अश्विनी आणि संभाजी केशवराव इंगोले रा.इंदोर (मध्य प्रदेश) यांचे सुपुत्र, आयु. श्रीकांत यांचा मंगल परिणय पार पडला. या वेळी स्मारक समितीचे दिवाकर माने यांच्यासह स्मारक समितीचे पदाधिकारी वधू आणि वराकडून दहा व्यक्ती कशा मोजक्याच १५ व्यक्तींच्या उपस्थितीत हा मंगल परिणय पार पडला. ज्यांची आर्थिक परिस्थिती गरिबीची आहे, अशा व्यक्तींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकमध्ये येऊन परिणय विधी पार पाडण्याचे आवाहन स्मारक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

(संपादन ः राजन मंगरुळकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com