esakal | मध्य रेल्वेमधील लाईन ब्लॉकचा काही रेल्वेंना फटका
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

महत्वाच्या कामामुळे ता. १३ आणि ता. १४ मार्च रोजी काही महत्वाच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही उशिरा धावणार असल्याचे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने कळविले आहे

मध्य रेल्वेमधील लाईन ब्लॉकचा काही रेल्वेंना फटका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : मुंबई विभागातील कल्याण- कसारा सेक्शन मध्य रेल्वेमध्ये हाती घेतलेल्या महत्वाच्या कामामुळे ता. १३ आणि ता. १४ मार्च रोजी काही महत्वाच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही उशिरा धावणार असल्याचे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने कळविले आहे.

या गाड्या आहेत रद्द

ँ गाडी संख्या १७६११ नांदेड ते मुंबई राज्यराणी एक्सप्रेस ता. १३ मार्च रोजी पूर्णतः रद्द करण्यात आली आहे.
ँ गाडी संख्या १७६१२ मुंबई ते नांदेड राज्यराणी एक्सप्रेस ता. १४ मार्च रोजी पूर्णतः रद्द करण्यात आली आहे . 
ँ गाडी संख्या ११४०२ नागपूर ते मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस ता. १३ मार्च रोजी पूर्णतः रद्द करण्यात आली आहे . 
ँ गाडी संख्या ११४०१ मुंबई ते नागपूर नंदीग्राम एक्सप्रेस ता. १४ मार्च रोजी पूर्णतः रद्द करण्यात आली आहे. 

उशिरा धावणारी गाडी : 
 

ता. १३ मार्च रोजी सिकंदराबाद येथून सुटणारी गाडी संख्या १७०५८ सिकंदराबाद ते मुंबई देवगिरी एक्सप्रेस ता. १४ मार्च रोजी भुसावळ विभागात उशिरा धावेल. आणि इगतपुरी येथे सकाळी ०५:५० नंतर पुढे मुंबईकडे धावेल. ९० मिनिटे उशिरा धावेल. 
यामुळे प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबद्दल दक्षिण मध्य रेल्वे दिलगीर व्यक्त करत आहे. 

हेही वाचाVideo : होला हल्ला महल्लाचा जल्लोष...कुठे ते वाचा...

चक्क विद्यार्थ्यींनीनी चालविली शाळा

नांदेड : जगतिक महिला दिनानिमित्त महानगर पालिकेच्या वजिराबाद येथील प्राथमिक शाळेमध्ये सोमवारी (ता. नऊ) सर्व शाळा मुलींनी चालविली. मुख्याद्यापक ते सेवकापर्यंतचे सर्व कामकाज विद्यार्थीनी चालवून आम्हीसुद्धा कमी नाही हा संदेश दिला. 

वजिराबाद येथे जागतिक महिला दिनानिमित्त इयत्ता आठवीच्या मुलींनी सोमवारी (ता. नऊ) एक दिवस शाळा चालविण्याचा कार्यक्रम घेतला. यामध्ये सर्व आठवीच्या मुलींनी इयत्ता पाचवी ते सातवीचे वर्ग शिकवण्याचे काम पाहिले. दिव्या धोपटे ही मुख्याध्यापक झाली आणि इतर काही विद्यार्थ्यांनी शिक्षक आणि सेवकाचे काम केलेले आहे. त्यांचे कौतुक करत सहशिक्षक विठ्ठल चांदणे, शाळेचे मुख्याध्यापक श्री सज्जन शाळेतील सर्व शिक्षक श्रीमती सोनार, श्रीमती पतंगे, श्री कदम व श्री साईनाथ चिद्रावार यांनी परिश्रम घेतले.