
परभणी : ‘न्याय मिळेपर्यंत मदत स्वीकारणार नाही’, अशी भूमिका घेत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाने शासकीय मदत घेण्यास नकार दिला. त्यामुळे शासनाकडून जाहीर झालेल्या दहा लाखांच्या मदतीचा धनादेश घेऊन बुधवारी त्यांच्या घरी गेलेले महसूल विभागाचे पथक माघारी फिरले.