परभणी येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या हिंसाचारानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला आहे. त्यानंतर याप्रकरणी राज्यभरातून प्रतिक्रिया उमटल्या.
परभणी : न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryawanshi) यांच्या आई विजयाबाई व्यंकट सूर्यवंशी (Vijayabai Suryavanshi) यांनी आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सोमवारी (ता. १०) पत्रकार परिषद घेऊन त्यांनी धस यांच्या याप्रकरणी मध्यस्थीच्या प्रयत्नांचा खुलासा केला आणि धस यांनी आपले कुटुंब पोलिसांच्या (Parbhani Police) स्वाधीन करून पाहावे, असा सल्ला दिला.