esakal | मुलाच्या मारहाणीत आईचा मृत्यू,संवेदनहिन लोकांनी बनवले व्हिडिओ
sakal

बोलून बातमी शोधा

Criminal beaten to death by retired police in Pune

काही वेळाने बाबासाहेबने दोघांना लाकडाने मारहाण करण्यास सुरुवात केली. केविलवाण्या किंकाळ्या देऊन सुध्दा या त्याला पाझर फुटला नाही. आणि विशेष म्हणजे पाहणाऱ्यांनीही या पाषाण हृदयी मुलाच्या तावडीतून वृद्धाला सोडविण्यापेक्षा याचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात धन्यता मानली.

मुलाच्या मारहाणीत आईचा मृत्यू,संवेदनहिन लोकांनी बनवले व्हिडिओ

sakal_logo
By
चंद्रकांत राजहंस

शिरूर कासार (जि.बीड) : पितृदिनाच्या पूर्वसंध्येला मुलाने आपल्या जन्मदात्या माता-पित्याला जोरदार अमानुष मारहाण केली. मारहाणीत आईचा मृत्यू झाला, तर पिता गंभीर जखमी आहे. पाषाण हृदयी मुलाच्या कृत्यापासून वृद्ध दाम्पत्याला वाचविण्यापेक्षा संवेदनाहिन समाजाने याचे व्हिडीओ चित्रीकरण केले. सदर घटना तालुक्यातील Shirur Kasar घाटशिळ पारगाव शनिवारी (ता.१९) घडली. विशेष म्हणजे कोरोनातून बऱ्या झालेल्या मुलाला भेटायला आलेल्या वृद्ध आई-वडिलांना या दिवट्याने पितृदिनाच्या पूर्वसंध्येला मारहाण केली. यात शाहूबाई त्र्यंबक खेडकर (वय ७०) या वृद्धेचा मृत्यू झाला. बाबासाहेब त्र्यंबक खेडकर (वय ४५) असे आरोपीचे नाव आहे. त्याला रविवारी (ता.२०) शिरुर ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक डॉ. रामचंद्र पवार यांच्या पथकाने अटक केली. या बाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की शिरुर कासार तालुक्यातील Crime Against Elderly People त्र्यंबक विश्वनाथ खेडकर (वय ७५ ) व त्यांची पत्नी शाहुबाई त्र्यंबक खेडकर (वय ७०) हे आपल्या मुलीकडे येळी (ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) Ahmednagar येथे राहत होते. त्यांचा मुलगा बाबासाहेब खेडकर याला कोरोनाची बाधा झाली होती. त्यातून बरा झाल्याने शाहूबाई व त्र्यंबक खेडकर त्याला भेटण्यासाठी घाटशिळ पारगावला आले. काही वेळाने बाबासाहेबने दोघांना लाकडाने मारहाण करण्यास सुरुवात केली. केविलवाण्या किंकाळ्या देऊन सुध्दा या त्याला पाझर फुटला नाही. आणि विशेष म्हणजे पाहणाऱ्यांनीही या पाषाण हृदयी मुलाच्या तावडीतून वृद्धाला सोडविण्यापेक्षा याचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात धन्यता मानली. Son Brutally Killed His Mother, Father Serious In Shirur Kasar Beed Crime News

हेही वाचा: उमरग्यात टेम्पोच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

मुलाच्या मारहाणीत आईचा शाहूबाईचा मृत्यू झाला. तर वडील त्र्यंबक खेडकर यांना नगर येथे उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. आरोपीची पत्नीही मुलासह माहेरीच राहते. सहायक पोलिस निरीक्षक डॉ. रामचंद्र पवार यांनी शेतात लपलेल्या आरोपी बाबासाहेब खेडकर यास अटक केली.

loading image
go to top