दारु सोडण्यासाठी सांगितल्याने मुलाने आईचाच कापला गळा

बापू गायखर
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

लोहा - दारूचा व्यसनी आणि वैफल्यग्रस्त माणुस कुठल्या  थराला जाईल याचा नेम नाही.” कामाकडं ध्यानदे. सारखं दारू घेत बसु नको “ असं दररोज टुमणं लावणाऱ्या जन्म दिलेल्या आईचा राग मनात धरून दारूच्या नशेत आईचा धारदार वस्तऱ्याने गळा कापल्याची घटना नुकतिच घडली. 

ही घटना बुधवारी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान हिप्परगा (ता. लोहा) येथे घडली. लोह्यापासून अवघ्या दहा किलोमिटर अंतरावर हिप्परगा (चितळी) गाव आहे. गावात हेअर कटिंग सलुनचे दुकान असलेला पांडुरंग यादव कोंडामंगले दारूच्या आहारी गेला. त्याला दोन मुलगे, एक मुलगी असल्याने कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेसाठी पत्नी माहेरी गेली. असता त्याची आई (वय ७०) ‘कामधंद्याकडे लक्ष दे दारू रोजच कशासाठी घेतो‘ असे म्हणताच पांडुरंगला राग आला रागाच्या भरात धारदार वस्तऱ्याने गळा कापला. उपचाराला नेत असतांना शांताबाई यादव कोंडामंगले यांचे निधन झाले. 

अधिक तपास लोहा पोलिस निरिक्षक बालाजी मोहिते आणि माळाकोळी पोलिस करत आहेत. आरोपी पांडुरंग यादव कोंडामंगले यास ताब्यात घेतले आहे.

Web Title: son killed his mother