
अतीक सय्यद
आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील बऊर येथील अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलाने मेहनत आणि जिद्दीच्या बळावर महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत शंभर पैकी ८४ गुण घेत न्यायाधीश होण्याचा बहुमान मिळवला. आता तो न्यायाधीशपदी विराजमान होणार असल्याने ग्रामस्थांनी त्याचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले.