
गेवराई : कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची. वडिलांनी गवंडी काम आणि कोरडवाहू शेती करत मुलाच्या शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ दिले. वडीलांच्या कष्टाची जाणीव ठेवत मुलानेही महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेत राज्यातून ३० वा क्रमांक मिळवित श्रेणी एकचे पद प्राप्त केले.