

Shepherd families travel with their belongings on bullock carts in search of water, fodder and grazing land amid drought conditions in the Sonpeth region
esakal
सोमनाथ नागुरे
सोनपेठ : दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस गडद होत असून, बैलांच्या मदतीने संसाराचा गाडा ओढत निघालेली मेंढपाळ कुटुंबे, बैलगाड्यांवर संसारोपयोगी साहित्य, पाण्याचे डबे, कपडे, जगण्यासाठी लागणारे साहित्य घेऊन मजल दरमजल करणारी अनेक स्थलांतरीत कुटुंबे रस्त्यावरून निघल्याचे चित्र दुष्काळाची दाहकता दर्शवत आहेत. पाणी, चारा आणि उदरनिर्वाहाच्या शोधात सुरू असलेली जगण्याची लढाई दिवसेंदिवस तीव्र होत आहे.