

Parbhani News
esakal
सोनपेठ: केवळ बारदाना उपलब्ध नसल्याने तालुक्यातील नाफेडच्या खरेदी केंद्रावर हरभरा खरेदी थांबली आहे. विशेष म्हणजे हे खरेदी केंद्र सुरू होऊन काही दिवस झालेले असतानाच हा प्रश्न उद्भवला आहे. त्यामुळे केंद्रावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. नाफेडच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन तातडीने बारदाना उपलब्ध करून खरेदी नियमित सुरू ठेवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.