esakal | वेळेवर झालेल्या पावसाने दोन लाख ७१ हजार हेक्टरवर पेरणी
sakal

बोलून बातमी शोधा

fa

परभणी जिल्ह्यात एकूण ५२.४२ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असल्या तरी अद्याप निम्या क्षेत्रावर पेरणी शिल्लक राहिली आहे. दरम्यान, पाऊस गायब झाल्याने काही भागातील शेतकऱ्यांनी पेरण्या थांबवल्या आहेत.

वेळेवर झालेल्या पावसाने दोन लाख ७१ हजार हेक्टरवर पेरणी

sakal_logo
By
कैलास चव्हाण

परभणी ः जिल्ह्याच्या काही भागात वेळेवर पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पेरण्यांना वेग आला आहे. आतापर्यंत दोन लाख ७१ हजार ७९ हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. एकूण ५२.४२ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असल्या तरी अद्याप निम्या क्षेत्रावर पेरणी शिल्लक राहिली आहे. दरम्यान, पाऊस गायब झाल्याने काही भागातील शेतकऱ्यांनी पेरण्या थांबवल्या आहेत.

जिल्ह्यात यंदा खरिपासाठी पाच लाख १७ हजार १४२.६५ हेक्टर प्रस्तावित करण्यात आले आहे. जिल्ह्यात सोयाबीन आणि कपाशी ही प्रमुख पिके घेतली जातात. यंदाच्या हंगामासाठी सोयाबीन दोन लाख १९ हजार २०२ हेक्टर, कपाशी एक लाख ८५ हजार ७२ हेक्टर, तूर ५० हजार ६०८ हेक्टर, मूग ३३ हजार ९९८.९५ हेक्टर, उडीद ११ हजार ६७५.९६ असे क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. दरवर्षीपेक्षा यंदा मान्सूनचे वेळेवर आगमन झाल्याने पेरण्या लवकर सुरू झाल्या आहेत. परभणी आणि गंगाखेड तालुके वगळता अन्य तालुक्यांत ५० टक्क्यांहून अधिक पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. दोन दिवसांत चांगला पाऊस झाल्यास पुढील दोन आठवड्यांत पेरण्या पूर्ण होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - शेती साहित्य निर्मितीची चाके रुतली, कशामुळे ते वाचा...

सव्वालाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी
जिल्ह्यात कपाशीचे मोठे क्षेत्र आहे. एक लाख ८५ हजार ७२० हेक्टर प्रस्तावित क्षेत्रापैकी आतापर्यंत एक लाख १६ हजार ४०३ हेक्टरवर म्हणजे ६२.६८ टक्के कपाशीची लागवड झाली आहे. तर सोयाबीनची दोन लाख १९ हजार २०२ हेक्टर क्षेत्रापैकी एक लाख २४ हजार ५०४ हेक्टरवर पूर्ण झाली आहे. तुरीची १९ हजार १६४, मूग नऊ हजार ६५२, उडीद ७९९ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

हेही वाचा - धर्माबादला आता बोगस बियाणांचा विळखा

यंत्रावर अधिक पेरणी
पांरपरिक पेरणी पद्धतीऐवजी यंत्राच्या सह्यायाने पेरणीवर शेतकरी भर देत आहेत. ट्रॅक्टर आणि बैलचलित पेरणी यंत्राचा वापर केला जात आहे. त्यामुळे वेळेची आणि मनुष्यबळाची बचत होत असून तक्ताळ पेरणी होत आहे.

तालुका  पेरणी          टक्के
परभणी- ४७ हजार ५२  ४८.७६
गंगाखेड-२६ हजार ५५८ ४८.५९
सोनपेठ-१९ हजार ३३६  ५५.६४
पालम-२४ हजार ३६  ५२.०२
पाथरी-२६ हजार ८८०  ५८.५४
मानवत-२८ हजार ९४२  ६९.४८
जिंतूर-३४ हजार ५९०  ४१.०८
पूर्णा-२९ हजार १७९  ५२.६१
सेलू-३४ हजार ५०६  ५९.५३
एकूण- दोन लाख ७१ हजार ७९  ५२.४२