
हिंगोली : जिल्हा पोलिस दलामध्ये गतवर्षी सर्वसाधारण बदल्यांच्या प्रक्रियेत अनेक पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. परंतु, त्यातील काही पोलिस कर्मचारी पूर्वीच्याच ठिकाणी रुजू आहेत. अशा ५० पोलिस कर्मचाऱ्यांना तत्काळ बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातून काढण्यात आले आहेत.