फिरस्तीवरील हल्ले निंदनीय व काळीमा फासणारे : विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके

प्रल्हाद कांबळे
सोमवार, 16 जुलै 2018

महाराष्ट्रात राहणारे व्यक्ती विविध कला कौशल्यांच्या आधारे वेगवेगळ्या भागात फीरस्ती करुन उदरनिर्वाह करतात. परंतु त्यांच्यावर होणारे प्राणघातक हल्ले म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या परंपरेला काळिमा फासणारे आहे.

नांदेड  : महाराष्ट्र हे पुरोगामी आणि विविध वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीप्रधान राज्य आहे. या ठिकाणी राहणारे व्यक्ती विविध कला कौशल्यांच्या आधारे वेगवेगळ्या भागात फीरस्ती करुन उदरनिर्वाह करतात. परंतु त्यांच्यावर होणारे प्राणघातक हल्ले म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या परंपरेला काळिमा फासणारे आहे. तसेच या घटना निंदनीय असल्याचे मत नांदेड व औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी व्यक्त केले. 

राज्यात नागपूर, धुळे, नंदुरबार, औरंगाबाद परिक्षेत्र, औरंगाबाद ग्रामिण, जालना, उस्मानाबाद, तसेच नांदेड परिक्षेत्रात लातुर जिल्ह्याचे काही नागरिक उदरनिर्वाहसाठी अन्य जिल्ह्यात वास्तव्यास जातात. त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांचा व कौशल्यांचा वापर करून ते आपला संसार गावोगावी फिरून चालवितात. परंतु मागील काही दिवसांपासून मुल पळविणारी व किडनी चोरी करणारी टोळी सक्रीय झाल्याच्या अफवा मोठ्या प्रमाणात सोशल मिडीयाद्वारे पसरत आहेत. याचा फटका या फिरस्तीवर असलेल्या लोकांना बसत आहे. वैजापूर हद्दीत हत्या व काही ठिकाणी मारहाणीचे प्रकार घडले आहेत. यामुळे गाव सोडून राहणाऱ्या या गरीब समाजातील लोकांत भितीचे वातावरण पसरले आहे. त्यांच्यावर होणारे हल्ले अतिशय निंदनीय असल्याचे श्री. वारके यांनी म्हंटले आहे. 

या घटना घडु नये म्हणून त्यांनी आपल्या दोन्ही परिक्षेत्रातील अधिनस्त अधिकाऱ्यांना सुचना दिल्या आहेत. त्यात आपल्या कार्यक्षेत्रात जनजागृतीसाठी चित्रफीत, आॅडीओ संदेश, व्हाट्सअप, फेसबुक तसेच इतर सोशल मिडीयाचा वापर करून या अफवांबाबत जागरुकता करावी. तसेच आठवडी बाजारमध्ये लाऊडस्पीकरवरून त्याची माहिती देणे. पोलिस अधिक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी, प्रभारी ठाणेदार, यांनी गावगावी पोलिस पाटील यांच्या बैठका आयोजित कराव्यात. भित्तीपत्रके तयार करुन मुख्य ठिकाणी लावावेत, वर्तमानपत्राद्वारे आणि रेडोवरून जागृती करावी. तसेच अफवा परसविणाऱ्याविरूध्द कडक पाऊले उचलून फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.  

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Special Inspector General of Police Dr Suhas Warke Nanded