
बीड : परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येबाबत माहिती देणाऱ्यांना विशेष तपास समितीने बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे. यासाठी तपास समितीप्रमुख पंकज कुमावत यांनी स्वत:चा क्रमांकही जाहीर केला आहे. माहिती देणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे पत्रकात म्हटले आहे.