esakal | विशेष बातमी : ज्योतिर्लिंग औंढा नागनाथची अशी आहे महती; बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे स्थान, वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

मागच्या चार- पाच वर्षात याठिकाणी येणाऱ्या भाविकांमध्ये आणि पर्यटकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे. म्हणूनच मंदिराचा परिसर सुंदर अद्यावत झालेला आहे. तसेच संस्थांनच्या जागेवरील नागनाथ उद्यानही अत्यंत विलोभनीय अस आहे.

विशेष बातमी : ज्योतिर्लिंग औंढा नागनाथची अशी आहे महती; बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे स्थान, वाचा सविस्तर

sakal_logo
By
कृष्णा ऋषी

औंढा नागनाथ (जिल्हा हिंगोली) :  प्राचीन काळात पाषाणात बांधलेल्या बारा ज्योतिर्लिंगामधील महाराष्ट्रातील हे आठव्या स्थानावर औंढा नागनाथ असं हे ज्योतिर्लिंग. निसर्गतः ह्या ज्योतिर्लिंगाला निसर्गाने भरभरुन असं सौंदर्य दिलेलं आहे. म्हणूनच येथे येणारा प्रत्येक भाविक दर्शनानंतर पर्यटनाचाही आनंद घेत असतो.

मागच्या चार- पाच वर्षात याठिकाणी येणाऱ्या भाविकांमध्ये आणि पर्यटकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे. म्हणूनच मंदिराचा परिसर सुंदर अद्यावत झालेला आहे. तसेच संस्थांनच्या जागेवरील नागनाथ उद्यानही अत्यंत विलोभनीय अस आहे. बाजूलाच औंढा तलाव असल्यामुळे या तलावांमध्ये येणाऱ्या पर्यटकांना बोटिंगचाही आनंद घेता येतो. गोकर्ण पहाडीवरील वन खात्याच्या २५० एकर जमिनीवरील वन पर्यटन उद्यानही साक्षात निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी एकदम छान बनवलेला आहे. तेथेही बऱ्याच प्रमाणामध्ये पर्यटक निसर्गाचा आनंद घेत असतात. नागनाथ मंदिर असो नागनाथ उद्यानवा वनपर्यटन असो या सगळ्या गोष्टी निसर्गाने भरभरुन दिल्यामुळे औंढा नागनाथ हे तीर्थक्षेत्र ज्योतिर्लिंगाच्या रुपाने तर पुढे येतच आहे. परंतु एक सुंदरसं पर्यटन क्षेत्र ही लवकरच नावारुपाला येत आहे. 

उद्यानाकडे बऱ्याच प्रमाणामध्ये दुर्लक्ष झाल्यामुळे हेळसांड झालेली दिसून येते

मात्र कोरोना महामारीमुळे गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेली मंदिरे, पर्यटनस्थळ यामुळे या उद्यानाकडे बऱ्याच प्रमाणामध्ये दुर्लक्ष झाल्यामुळे हेळसांड झालेली दिसून येत आहे. त्यातच नागनाथ उद्यान हे प्रायोगिक तत्वावर खाजगी व्यक्तींकडे दिलेले असल्यामुळे त्यांची मुदत संपलेली आहे. तेव्हा लवकरात लवकर ह्याचा पुन्हा लीलाव होऊन हे पर्यटक उद्यान लवकरात लवकर विकसित व्हाव जेणेकरुन येणाऱ्या पर्यटकांना चांगली सुविधा उपलब्ध होईल. 

पर्यटक औंढा नागनाथ मंदिरातही दर्शनासाठी भेट देत आहेत

काही दिवसापासून दिपावली पाडवा, भाऊबीज या मुहूर्तावर महाराष्ट्र शासनाने सर्व मंदिरे आणि पर्यटनस्थळेही सुरु केलेले आहेत. त्यामुळे दिवाळी सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटक औंढा नागनाथ मंदिरातही दर्शनासाठी भेट देत आहेत. तसेच दर्शनानंतर नागनाथ उद्यान आणि वन उद्यान या ठिकाणीही भेटी देऊन बोटिंगचाही आनंद घेण्यासाठी येत आहेत. तेव्हा नागनाथ उद्यान आणि वन उद्यान ही दोन्ही अद्यावतरीत्या पर्यटकांसाठी सुरु करावी अशी मागणी पर्यटकांमधून होत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

loading image