महापरीनिर्वान दिन व इज्तेमासाठी विशेष रेल्वे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

नांदेड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वान दिनानिमित्त मुंबई येथे होणाऱ्या प्रवाश्यांच्या गर्दी करिता आदिलाबाद ते मुंबईमार्गे नांदेड, औरंगाबाद ही विशेष रेल्वे चालविण्यात येणार आहे. प्रवाशांना विनंती आहे की आपण या विशेष रेल्वेचा लाभ घ्यावा.

गाडी संख्या 07058 हि गाडी ता. पाच डिसेंबर रोजी आदिलाबाद येथून सकाळी सात वाजता सुटेल. आणि किनवट, भोकरमार्गे नांदेड येथे अकरा वाजता पोहोचेल. नांदेड येथून सकाळी सव्वाअकरा वाजता निघून परभणी, जालना, औरंगाबादमार्गे दादर येथे ता. सहा डिसेंबरला सकाळी तीन वाजून १०मिनीटाला पोहोचेल.

परतीच्या प्रवासात गाडी संख्या 07057  ही गाडी ता. सात रोजी मध्यरात्री 00.50 वाजता दादर येथून निघेल आणि मनमाड, औरंगाबाद, परभणीमार्गे नांदेड येथे दुपारी 13.25 वाजता पोहोचेल. नांदेड येथून 13.30 वाजता निघेल आणि आदिलाबाद येथे सायंकाळी 18.00  वाजता पोहोचेल.

बडनेरा इज्तेमानिमित्त नांदेड ते नारखेर विशेष रेल्वे

नांदेड : बडनेरा येथे होणाऱ्या इज्तेमानिमित्त नांदेड ते नारखेर विशेष रेल्वे चालविण्यात येणार आहे. प्रवाशांना विनंती आहे की आपण या विशेष रेल्वेचा लाभ घ्यावा.

गाडी संख्या 07647 ही गाडी ता. सहा डिसेंबर रोजी नांदेड येथून सायंकाळी चार वाजता सुटेल आणि पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशीम, अकोला, मुर्तीजापूर, बडनेरा, नवी, चांदूर बझारमार्गे ता. सात डिसेंबरला सकाळी पाच वाजून १० मिनीटाला पोहोचेल.

परतीच्या प्रवासात गाडी संख्या 07648 ही गाडी ता. नऊ डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता नारखेर येथून निघेल आणि अकोला, वाशीम, हिंगोलीमार्गे नांदेड येथे ता. १० डिसेंबर रोजी सकाळी पावणेतीन वाजता पोहोचेल.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वान दिनानिमित्त मुंबई येथे जाणाऱ्या भिमभक्तांसाठी विशेष रेल्वे चालविण्यात आहे. तसेच बडनेरा येथे इज्तेमानिमित्त विशेष गाडी चालविण्यात येणार आहे. या दोन्ही गाड्यांचा प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन दक्षिण मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाचे राजेश शिंदे यांनी कळविले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Special train for Mahaparinivarvan day and Ijtema