
केज : चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगातील कार रस्त्याच्या कडेला तीन-चारवेळा उलटली. यात कारचालक व त्याचे वृद्ध वडील जखमी झाले. विशेष म्हणजे कारमधील एक वर्षाची चिमुकली सुखरूप आहे. केज-कळंब रस्त्यावरील साळेगावजवळ शनिवारी (ता.१२) दुपारी चारला ही घटना घडली.