Bhokardan Accident : जीपच्या धडकेत दुचाकीस्वार महिला ठार
Accident News : भोकरदन येथे भरधाव जीपच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
भोकरदन : भरधाव जीपने दुचाकीला दिलेल्या धडकेत भोकरदन येथील दीपाली महेंद्र बाकलीवाल (वय ४५) यांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता. सात) रात्री आठच्या दरम्यान भोकरदन-सिल्लोड रोडवर बुलढाणा अर्बन सोसायटीसमोरील चौकात घडली.