जिंतूर : नांदेडहून जालन्याकडे भरधाव निघालेला ट्रक रस्त्यालगतच्या झाडावर आदळून झालेल्या अपघातात चालकासह क्लीनर जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी (ता. १५) पहाटे शहरापासून पाच किलोमीटरवरील पुंगळा पाटीजवळ घडली..ट्रक (एपी-१६, टीजे-६३१८) भरधाव वेगाने नांदेडहून जालन्याकडे निघाला असता, पुंगळा शिवारात ट्रकचालक अशोक दावलजी कांबळे (वय ३३, रा. नरगळ, ता. देगलूर) याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगतच्या पिंपळाच्या झाडावर ट्रक जोरात आदळला. .या अपघातात कॅबिनमध्ये झोपलेला क्लीनर झाड, केबिन व झोपाळ्यात दबून जागीच ठार झाला, तर चालक कांबळे केबिनमध्ये झाड घुसल्याने त्यात अडकून गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत तो मदतीसाठी विव्हळत होता. त्यावेळी रस्त्यावरील नागरिक, इतर वाहनचालकांनी मदत करून त्यास बाहेर काढण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यात यश आले नाही..सकाळी सातच्या सुमारास दोन क्रेन बोलावून त्याद्वारे ट्रक मागे ओढून जखमी चालकास बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. तब्बल चार तास मृत्यूशी झुंज देणाऱ्या चालक कांबळेचा सकाळी आठला मृत्यू झाला; परंतु त्यास बाहेर काढण्यात यश आले नाही. त्यानंतर दोन तांसाच्या अथक प्रयत्नांतर ट्रक मागे ओढून केबिनमधील कांबळे यांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले..Pune Traffic: पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कसा सुटणार? आयुक्तांनी सांगितला प्लॅन, दीड वर्षात मोठे बदल.दोन क्रेन, एका जेसीबीचा वापरग्रामीण रुग्णालायतील १०८ रुग्णवाहिका चालक, वैद्यकीय अधिकारी, शहर दलाचे अधिकारी-कर्मचारी, महामार्ग पोलिस पथकाचे अधिकारी-कर्मचारी व नागरिकांनी सलग सहा तास अथक प्रयत्न केले. अपघातग्रस्त ट्रक मागे ओढण्यासाठी दोन क्रेन, एका जेसीबीचा वापर करण्यात आला. त्यामुळे जिंतूर-औंढा महामार्गावरील वाहतूक एक तास विस्कळित झाली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.