Latur Accident : भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; एक ठार, एक जखमी, किनगावात अपघात
Accident News : लातूर जिल्ह्यातील किनगाव टोल नाक्याजवळ भरधाव ट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाला आहे. अपघातात एकजण जखमी झाला असून कारचेही नुकसान झाले आहे.
किनगाव (जि. लातूर) : अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्याजवळ गुरुवारी (ता.२२) दुपारी भरधाव ट्रकने धडक दिल्याने दुचाकीवरील एक जण ठार झाला, तर अन्य जखमी झाला आहे. त्यातच या ट्रकने धडक दिल्याने कारचेही नुकसान झाले.