देगलूर - देगलूर नांदेड राज्य महामार्गावर आदमपूरफाटा येथे ता.१२ रोजी दुपारी दीडच्या सुमारास एका भरभाव ट्रकने मोटरसायकलस्वारास जोराची धडक दिल्याने मोटरसायकलवरील तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी नायगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
या संदर्भात हाती आलेली माहिती अशी की, बुधवार ता. १२ रोजी दत्ता लछमा मेकेलवाड, रा. मनुर हा तरुण मोटरसायकल क्र. एम.एच. २६, ए.ई.९६६८ वर बसून आदमपुर मार्गे देगलूर कडे जात होता. त्याचवेळी नांदेडहून देगलूरकडे भरधाव जाणारा ट्रक क्र. आर.जे.२१,जी. सि.९७८६ ने मोटरसायकल स्वारास जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकल वरील तरुणाच्या डोक्यास गंभीर जखम होऊन रक्तबंबाळ झाला होता.
ही घटना दुपारी दीड वाजता आदमपुर फाट्यावर घडली. त्याचवेळी रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक डि.के. जांभळीकर हे खतगाव परीक्षा केंद्रावर आपले कर्तव्य बजावुन रामतीर्थकडे जात असताना खतगाव फाट्यावरील अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत जखमी मोटरसायकल स्वारास आदमपुरचे चेअरमन अंबादास शिनगारे, ऑटो चालक संजय चिंतले यांच्यासह स्थानिकच्या मदतीने जखमीस अंबुलन्सद्वारे नायगाव ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.