Ausa Protesters Stage Sholay Style Agitation by Climbing Water Tank for maratha reservation
sakal
औसा - अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी (ता. ३) लातूर जिल्हा बंदची हाक देण्यात आली. या बंदला औसा शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच शहरातील प्रमुख बाजारपेठेसह दुकाने आणि व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली होती.