

SRTM University Wins Gold Rating Ranks 12th in National Green University Ranking 2026 for Green Campus Excellence
esakal
-श्याम जाधव
नवीन नांदेड: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाच्या क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर ऐतिहासिक कामगिरी करत 'राष्ट्रीय हरित विद्यापीठ रँकिंग २०२६' मध्ये देशात १२ वा क्रमांक पटकावला आहे. १०० पैकी ९२.५ गुण मिळवत विद्यापीठाने प्रतिष्ठेचे 'गोल्ड रेटिंग' प्राप्त केले असून, महाराष्ट्रातील सार्वजनिक अकृषिक विद्यापीठांमध्ये हा मान मिळविणारे ते एकमेव विद्यापीठ ठरले आहे.