SSC Results : यंदाही मुलींचीच बाजी

औरंगाबाद - दहावीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. यंदाही मुलींनीच बाजी मारली. त्या आनंदात जल्लोष करताना मुली.
औरंगाबाद - दहावीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. यंदाही मुलींनीच बाजी मारली. त्या आनंदात जल्लोष करताना मुली.

औरंगाबाद - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी दुपारी एक वाजता जाहीर झाला. जिल्ह्याचा एकूण ७७.२९ टक्के निकाल लागला असून, गतवर्षीपेक्षा यंदा दहावीच्या निकालात नऊ टक्‍क्‍यांची घसरण झाली आहे. यंदाही दहावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे. 

इयत्ता दहावीसाठी जिल्ह्यातून एकूण ६४ हजार ७६१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी पाच हजार ५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ३५ हजार ६४० मुलांपैकी २५ हजार ५७२ मुले उत्तीर्ण झाली. मुलांची टक्केवारी ७१.७५ टक्के आहे. जिल्ह्यातून २९ हजार १२१ विद्यार्थिनी परीक्षेला बसल्या होत्या. त्यापैकी २४ हजार ४७९ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. उत्तीर्ण मुलींची टक्केवारी ८४.०६ टक्के असून मुलांपेक्षा मुलींची टक्केवारी अधिक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com