
Naigaon : इज्जतगाव मार्गे धावणारी एसटी बस आणि ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा समोरासमोर बरबडा गावाशेजारी अपघात झाला असून, बसमधील जवळपास २५ प्रवासी जखमी झाल्याची घटना बुधवार (ता.२९) रोजी रात्री आठ वाजता घडली. यापैकी नऊ जणांना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात हलवले असून चौघेजण अधिक जखमी झाले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, बुधवारी रात्री नांदेडहून बरबडा मार्गे इज्जतगावं जाणारी बस नांदेड बस स्थानकातून सायंकाळी साडेसहा वाजता सुटते. ही बस रात्री आठ वाजता बरबडा-पाटोदा शिवारात असताना या बसचा (गाडी क्रमांक एम एच ०७/७२४४ आणि ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा (गाडी क्रमांक एम एच २४/ एडी २९३४ समोरासमोर अपघात झाला.