Maratha Reservation : कळंब मध्ये लातूर आगाराची एसटी बस फोडली

सकल मराठा समाजातर्फे बुधवार (ता. १४) केज कळंब महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
ST bus smashed
ST bus smashedSakal

कळंब - आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. त्यांची तबीयत खालावली आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी येथील सकल मराठा समाजातर्फे बुधवार (ता. १४) केज कळंब महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जवळपास दोन तास चाललेल्या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. दोन्ही बाजुंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

याप्रकरणी कळंब पोलिसांनी पाच जनाविरुद्द गुन्हे दाखल करण्यात आले आहे.दरम्यान गुन्हे दाखल करताच कळंब मध्ये आंदोलन चिघळण्याची शक्यता असून गुरवार (ता.१५) तालुक्यातील खडकी येथे लातूर आगाराची एसटी बस क्रमांक एम एच १४ बी.टी २५५५ ही अज्ञातांनी फोडली.ही बस लातूर आगाराची असून कळंब हून लातूरकडे प्रवाशी घेवून जात होते.

मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक वळणावर आहे त्यामुळे मराठा समाजात शासन विरोधी चीड निर्माण झाली आहे.सोमवार (ता.१२) रोजी कळंब तालुका बंद ठेवण्यात आला होता.त्यानंतर बुधवार (ता.१४) मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जमून निषेध केला होता. त्यानंतर केज कळंब मार्गावर‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले.

लोकांचे जिवीतास धोका निर्माण होईल अशा पध्दतीने रोडवर टायर जाळून वारहतुकीस अडथळा निर्माण करणे.या प्रकरणी कळंब पोलिसात पाच जणाविरुद्द गुन्हे दाखल झाले आहेत.अशोक सुभाष जगताप रा. पिंपळगाव डोळा, बाबुराव शेंडगे, शरद उर्फ पिंटू यादव, शुभम राखुंडे सर्व रा. कळंब, नितीन शंकर काळे रा. तांदुळवाडी यांच्या विरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

लातूर आगाराची एसटी बस फोडली

लातूर आगाराची एसटी बस क्रमांक एम एच १४ बी.टी २५५५ ही बस कळंब आगारातून प्रवाशी घेवून लातूर कडे जात होती. कळंब लातूर मार्गावरील खडकी जवळ बस थांबतात अज्ञातांनी बसच्या समोरील बाजूच्या काचा फोडल्या.यात प्राथमिक अंदाजानुसार १२ हजार रुपयाचे नुकासन झाले आहे.

- मिथुन राठोड, आगारप्रमुख कळंब.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com