Video : अन् एसटी चिखलात रूतली...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

समोरासमोरून येणाऱ्या दोन एसटी बस एकमेकांना साईड देताना चाक रूतेपर्यंत या चिखलात अडकून बसल्या. त्यामुळे बसमध्ये बसलेल्या प्रवाशांमध्ये भिंती निर्माण झाली.

परभणी : जिंतूर ते परभणी या महामार्गचे मागील अडीच वर्षापासून संथ गतीने काम सुरू आहे. तसेच या भागात धूळीचेही मोठे साम्राज्य आहे. परतीच्या पावसामुळे या भागात प्रचंड मोठ्या प्रमाणात चिखल झाला असून दुचाकीपासून ते एसटी बस, ट्रकपर्यंत अडकून पडत आहेत.

असाच काहीसा प्रकार या महामार्गावर घडला. समोरासमोरून येणाऱ्या दोन एसटी बस एकमेकांना साईड देताना चाक रूतेपर्यंत या चिखलात अडकून बसल्या. त्यामुळे बसमध्ये बसलेल्या प्रवाशांमध्ये भिंती निर्माण झाली. त्यामुळे प्रत्येक प्रवासी बसमधून सैरावैरा पळू लागले. त्यातच काही बहादर प्रवाशांनी आपतकालीन खिडकीतून बाहेर पडत सुखरूप सुटका करून घेतली.

या सर्व प्रकारात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र प्रश्न हा निर्माण होतो की, हा रस्ता खोदल्यानंतर या रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांची संख्या लक्षात घेता, संबंधित कंत्राटदाराने रस्त्याच्या बाजूला पर्याय म्हणून पक्का रस्ता तयार करून देणे अपेक्षित होते. परंतु, संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे व कंत्राटदारांच्या उदासीन धोरणामुळे कच्चा रस्त्यावरूनच जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST bus stuck in mud at Parbhani