- धनंजय शेटे
भूम - महाराष्ट्र राज्यातील बहुचर्चित भूम आगाराच्या भूम -बोरिवली या बसचे पुण्याकडे जाताना मागील एक टायर गळून पडला व एक टायर अडकून पडल्याने चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमध्ये प्रवास करत असलेल्या ८५ प्रवाशांचा जीव वाचला आहे. योगायोगाने आज परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धाराशिव जिल्ह्यामध्ये असताना ही घटना घडली आहे.