ST Strike : उमरग्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ४५ लाखांचे नुकसान

कर्नाटक, तेलंगणा आगाराच्या बसेसचा गल्ला वाढला,  खासगी वाहतुकदारांची सुरु आहे मनमानी!
ST Workers Strike News
ST Workers Strike News esakal
Updated on

उमरगा (जि.उस्मानाबाद) : विविध न्याय मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे २८ ऑक्टोबरपासुन (ST Workers Strike) सुरु असलेले संपाला वेगळे स्वरूप प्राप्त झाले आहे. उमरगा आगाराने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी काही बसेस सुरू केल्या होत्या. मात्र चालक, वाहकाला बाहेर जिल्ह्यातल्या कर्मचाऱ्यांनी गांधीगिरी करत अपमानीत केल्याने सर्वच कर्मचाऱ्यांनी रविवारपासून (ता.सात) संप, आंदोलनाला धार दिली. दरम्यान ऐन प्रवाशांच्या सिझनमध्ये गेल्या चार दिवसांपासून एकही बस धावु शकली नसल्याने आगाराचे जवळपास ४५ लाखांचे नुकसान झाले. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे (MSRTC) राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावे, यासह अन्य मागण्यासाठी सुरु असलेले आंदोलन वरचेवर चिघळत आहे. दिवाळी सणानिमित्त (Diwali Festival 2021) गावाकडे आलेल्या नागरिकांचा परतीचा प्रवास खडतर होत आहे. रविवारी सकाळपासुन बुधवारी (ता.दहा) रात्री उशीरापर्यंत आगारातून एकही बस धावली नाही. परिणामी प्रवाशांची ताराबंळ सुरूच आहे. पुणे, मुंबई, बोरिवलीसाठी आसन आरक्षित केलेल्या जवळपास तीनशे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. आगार प्रशासनाने दीडशे ते दोनशे प्रवाशांना रक्कम परत दिली आहे. दरम्यान दिवाळीच्या सिझनमध्ये उमरगा आगाराचे (Umarga ST Depot) दररोज दहा ते अकरा लाखाचे उत्पन्न होत होते. मात्र चार दिवसांपासून एकही बस बाहेर येऊ न शकल्याने जवळपास ४५ लाखांचे उत्पन्न बुडाले आहे.

ST Workers Strike News
शिव्या देऊ नको, असे सांगायला गेलेल्या युवकाचा कानच तोडला

जीप, स्कूल बस आणि कर्नाटक आगाराच्या बसेसचा वाढला गल्ला!

बस बंद असल्याने राज्य सरकारनेच खासगी वहानासाठी मुभा दिल्याने आता चक्क बसस्थानकातच खासगी वाहने प्रवाशांच्या सेवेसाठी तयार आहेत. मात्र त्यांची भाडे आकारणी खिशाला कात्री लावणारी आहे. लातूरला बससाठी ११o रूपये तिकीट आहे. मात्र जीपचालक दोनशे रुपये घेत आहेत. स्कुल बसही प्रवाशाच्या सेवेसाठी स्थानकात उभी रहात आहे. जकेकुर-चौरस्ता येथील खासगी बसचे पुण्यासाठी एक हजार रुपये मोजावे लागत आहेत. सोलापूरला जाण्यासाठीही आगाऊ रक्कम द्यावी लागत आहे. प्रवाशांना कर्नाटक आगाराच्या बसेसची प्रतिक्षा करावी लागत आहे. कर्नाटक, तेलंगणा आगाराचे चालक बसस्थानकाच्या लांब अंतरावर बस उभी करत आहेत.

निलंबनाची कारवाई गुलदस्त्यात !

महामंडळाने संपकरी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरू केली आहे. तरीही कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. उमरगा आगारातील कर्मचाऱ्यावर निलंबनाच्या कारवाई संदर्भातला कानोसा घेतला असता वरिष्ठ स्तरावरूनच कारवाई होईल, पण किती कर्मचाऱ्यांची याबाबतची माहिती मात्र सूत्राने गुलदस्त्यात ठेवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Deputy Collector Eknath Bangale inspected seized illegal sand stock and reviewed security, distribution, and e-auction plans in Gangapur taluka
The Education Department appointed two teachers at Sayyadpur ZP School after villagers protested against the shortage of teaching staff.
Progressive farmer Govardhan Ugle received the Maharashtra Krushibhushan Award for outstanding achievements in organic farming.
Food Safety Department inspection alerts triggered shop closures amid concerns over gutkha sales and loose edible oil distribution.
Marathi News Esakal
www.esakal.com