
लातूर : राज्यात शेतमाल खरेदीसाठी दोनच संस्था कार्यरत असताना मध्यंतरी खिरापतीसारख्या नोडल संस्था वाटण्यात आल्या आणि त्यांची संख्या ४४ वर गेली. आता या संस्थांना चाप बसणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पणनमंत्री जयकुमार रावल यांनी तशा हालचाली सुरू केल्या आहेत. यातूनच राज्यस्तरीय नोडल संस्था निश्चित करण्यासाठी एक राज्यस्तरीय समिती स्थापन केली आहे. ही समिती राज्यभरात ४४ संस्थांनी काय ‘उद्योग’ केले आहेत, याचीही तपासणी करणार आहे.