बीडमध्ये पोलिसांसह वाहनांवर दगडफेक : अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या

​ ​​​सकाळ वृत्तसेवा
Friday, 20 December 2019

बीड : नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएबी) व नागरिकत्व नोंदणी कायदा (एनआरसी) रद्द करावा, या मागणीसाठी शुक्रवारी (ता.19) पुकारलेल्या बंद दरम्यान बीडमध्ये जमावाने अचानक एसटी महामंडळाच्या बसवर दगडफेक करुन नुकसान केले. रोखण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या दिशेनेही दगडफेकीचा प्रकार घडला. दरम्यान, जमाव पांगविण्यासाठी पोलिसांनी आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. 

हेही वाचा-...तर झाडे तोडणाऱ्यांना बाळासाहेबांनी फटके दिले असते! - शरद पवार

नागरिकत्व सुधारणा कायदा व नागरिकत्व नोंदणी कायद्याच्या विरोधात शुक्रवारी बीडमध्ये बंद पुकारण्यात आला होता. जिल्ह्यात परळी, नेकनूर आदी इतर ठिकाणीही आंदोलने करण्यात आली. दरम्यान, बीड शहरात सकाळच्या वेळी शहरातील सुभाष रोड, बशीरगंज आदी भागातील व्यापारपेठा बंद होत्या. दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान जमावाने छत्रपती शिवाजी महाराज चौकात बसवर अचानक दगडफेक केली. बशीरगंज चौक भागातही मोठी दगडफेक झाली. यावेळी जमाव पांगविण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या दिशेनेही दगडफेकीची घटना घडली. यानंतर पोलिसांनी आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. शहरातील काही भागात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.

हे वाचलंत का?-(व्हिडीओ पाहा) जालना जिल्ह्यात तब्बल 400 किलो गांजा जप्त;ओडिसा राज्यातून होतेय...

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stone Pelting On Police, Vehicles; Tear Gas Broken Beed