mla anuradha chavan
sakal
फुलंब्री - दुष्काळाच्या झळा केवळ शेतातील पिकांनाच बसल्या नाहीत, तर शेतात राबणाऱ्या महिला शेतकऱ्यांच्या संसारालाही त्याची मोठी किंमत मोजावी लागत आहे. वर्षभर कष्ट करूनही यंदा कापसाचे अपेक्षित उत्पादन हाती आले नाही. त्यामुळे कापूस वेचणीच्या प्रत्येक बोंडासोबत महिलांच्या मनातील वेदनाही बाहेर पडत आहेत. या महिलांच्या कष्टांची आणि अडचणींची जाणीव करून घेण्यासाठी आमदार अनुराधा चव्हाण यांनी थेट आडगाव येथील कापसाच्या शेतात उतरून महिला शेतकऱ्यांशी संवाद साधला.