Storm Wreaks Havoc rain in Malegaon Makta Roof Sheets Blown Away
sakal
देगलूर - तालुक्यातील माळेगाव मक्ता येथे रविवारी (ता. २१) सायंकाळी अचानक आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने मोठे नुकसान झाले. पावसाचे प्रमाण अत्यल्प असले तरी वादळी वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने अनेकांच्या घरांवरील पत्रे उडून गेली, तर काही कच्च्या घरांच्या भिंती कोसळल्या. या नैसर्गिक आपत्तीत सुमारे १५ ते २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.