esakal | लातुरात पुरात अडकलेल्या कुटुंबाला हवाई दलाने वाचविले,तिघे सुखरुप/Latur Rain
sakal

बोलून बातमी शोधा

 पोहरेगाव (ता.रेणापूर, जि.लातूर) : भारतीय हवाई दलाने हेलिकाॅप्टरच्या साहाय्याने सालगड्याच्या कुटुंबास लातूर विमानतळावर सुखरुप सोडण्यात आले.

लातुरात पुरात अडकलेल्या कुटुंबाला हवाई दलाने वाचविले,तिघे सुखरुप

sakal_logo
By
सुधाकर दहिफळे

रेणापूर (जि.लातूर) : मांजरा नदीच्या (Manjara River Flood) पुरामुळे पोहरेगाव शिवारात अडकलेल्या सालगड्याच्या कुटुंबाला बुधवारी (ता.२९) सकाळी आठ वाजता भारतीय वायूसेनेच्या (Indian Air Force) हेलिकाॅप्टरच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले आहे. पोहरेगाव (ता.रेणापूर) (Renapur) येथील शेतकरी सदानंद शिंदे यांच्या शेतात सालगडी म्हणून राहणारे नागोराव किसन टिकनरे, पत्नी रुक्मिणी नागोराव टिकनरे व मुलगा चंद्रकांत नागोराव टिकनरे हे कुटुंब मांजरा नदीच्या पुरामुळे पोहरेगाव शिवारात (Latur) अडकले होते. मंगळवारी (ता.२८) सालगड्याच्या कुटुंबाला बाहेर काढण्यासाठी वायुसेनेच्या हेलिकॉप्टरला पाचारण करण्यात आले होते. दिवसभर हेलिकॉप्टरची प्रतिक्षा झाली. मात्र, हेलिकॉप्टरला उस्मानाबाद (Osmanabad) येथून पोहरेगावात येण्यासाठी अंधार झाला. यामुळे सालगड्याच्या कुटुंबांला बाहेर काढण्यासाठी अडचण आली.

हेही वाचा: नांदेड | देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीची तारीख ठरली!

आज बुधवारी लातूर विमानतळावरुन सकाळी ७.१७ मिनिटांनी वायुसेनेचे हेलिकाॅप्टर पोहरेगावच्या दिशेने गेले. ७.२७ मिनिटांनी पत्र्याच्या शेडवर बसलेले सालगड्याचे कुटुंब दिसल्यानंतर ७.३५ वाजता त्या कुटुंबाला हेलिकाॅप्टरमध्ये सुरक्षितरीत्या घेण्यात आले व आठ वाजता लातूर विमानतळावर हेलिकाॅप्टर आल्यानंतर सालगड्याचे कुटुंब सुखरुप सोडण्यात आल्याची माहिती औसा-रेणापूरचे उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, मंडळ अधिकारी महेश हिप्परगे यांनी दिली आहे.

loading image
go to top