
औसा : औसा शहरातील कुरेश गल्लीत एका तीन वर्षाच्या चिमुकलीवर मोकाट श्वानांने हल्ला करून या मुलीला गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी (ता.७) रोजी दुपारी घडली आहे. या लहान मुलीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर लातूर येथे उपचार सुरू आहेत. शहरात मोकाट श्वानांचा प्रश्न दिवसेंदिवस उग्र रूप धारण करीत असतांना हातावर हात धरून बसलेल्या पालिका प्रधासनाविरोधात नागरिक आक्रमक होत आहेत.