जालना - मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात चिमुकली ठार झाल्याची घटना शहरात मंगळवारी (ता. सहा) घडली. संध्या प्रभुदास पाटोळे (वय सात ) असे तिचे नाव आहे.
शहरात दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांच्या संख्येत वाढ होत आहे. हे मोकाट कुत्रे मुलांसह वृद्धांवर जीवघेणे हल्ले करीत आहेत. शहरातील गांधीनगर भागात आज सकाळी सात ते साडेतासच्या सुमारास संध्या पाटोळे ही खेळण्यासाठी घराबाहेर आली होती.