

अंबाजोगाई : स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास बनावट औषधी प्रकरणाची सखोल चौकशी करून, त्यात दोषी आढळणारे कंत्राटदार, अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.