

छत्रपती संभाजीनगर : राज्यात बारावी परीक्षेला मंगळवारी (ता. ११) सुरवात झाली. पहिल्याच दिवशी अनेक ठिकाणी गैरप्रकार समोर आले. कडेकोट उपाययोजनानंतरही राज्यभरात तब्बल ४२ विद्यार्थी कॉपी करताना पकडले गेले. त्यापैकी सर्वाधिक २६ प्रकरणे छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळाच्या अंतर्गत नोंदवली गेली.