वसमतमध्ये जमावबंदीच्या आदेशाला हरताळ....

file photo
file photo
Updated on

वसमत ( जिल्हा हिंगोली )  : वसमत येथे आठवडी बाजाराच्या दिवसी मंगळवारी ( ता.सहा ) नागरिकांनी शहरात तोबा गर्दी केली होती. विशेष म्हणजे मार्च च्या शेवटच्या आठवड्यापासून वसमत शहर व तालुक्यात कोरोणा संसर्ग वाढला असून रुग्ण संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. अशा स्थितीत नागरीकांची विना सोशल डिस्टन्सिंग होत असलेली गर्दी शासनाची व सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी आहे.

याबाबात माहिती अशी की, राज्यभरात कोरोणाची दुसरी लाट हाहाकार माजवत आहे. केवळ कोरोणा संसर्गच नाही तर कोरोनाने मृत्यू चार आकडाही वाढत आहे. नागरीकांना वेळोवेळी मास्क, सोशल डिस्टन्सिंग व सँनिटायझर या त्रीसुत्रीचा वापर करण्याचे आवाहन शासन, प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. परंतू नागरीकांची अनावश्यक गर्दी थांबता थांबत नसल्याने अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात दिवसा जमावबंदी व रात्री संचारबंदीचे आदेश दिले. दिवसा पाचपेक्षा जास्त लोकांस एकत्र येण्यास मनाई असताना वसमत शहरात मात्र या आदेशाला हारताळ लागल्याचे चित्र मंगळवारी दिसले. चेहऱ्यावर मास्क होते परंतू सोशल डिस्टन्सिंग फार फज्जा उडताना दिसला. विशेष म्हणजे शहरासह तालुक्यात कोरोनाचे रुग्न वाढत असल्याने शासकीय आणि खाजगी दवाखान्यात बेड शिल्लक नसल्याने उपचारासाठी इतरत्र जिल्ह्यात जावे लागत आहे. अशा परिस्थितीत लोकांनी नियमावली न पाळण चिंतेची बाब आहे. 

कापड दुकानात गर्दी.....

रस्त्यावरची गर्दी टिपता येऊ शकते परंतू मोठमोठ्या कापड दुकानात खचाखच गर्दी होत असून याकडे मात्र नगर परीषद प्रशासन, पोलिस प्रशासन लक्ष देत नाही. परीणामी संसर्गाचा स्पिरिट वाढत असून रुग्ण संख्या वाढवण्याचा धोका वाढत आहे. गर्दी जमवणार्या दुकानात स्टिंग ऑपरेशन करुन कारवाई केल्यास यावर ब्रेक लागू शकतो.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Marathwada Rain Waiting
Maharashtra Earthquake
Senior Congress Leader Shriram Patil Rajurkar Passes Away
Deputy Collector Eknath Bangale inspected seized illegal sand stock and reviewed security, distribution, and e-auction plans in Gangapur taluka
Marathi News Esakal
www.esakal.com