Ramling Tiger : आष्टी, पाटोद्यात थैमान घालणार पट्टेदार 'रामलिंग वाघ' पोहोचला बीड तालुक्यातील बाळाघाटच्या डोंगरपट्ट्यात! ​बेलखंडी परिसरात आढळले ताजे पायाचे ठसे

बीड जिल्ह्यातील आष्टी आणि पाटोदा तालुक्यांमध्ये धुमाकूळ घालणारा आणि आता थेट बीड तालुक्याच्या दिशेने सरकलेला 'रामलिंग वाघ' पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
The striped 'Ramling Tiger', captured on a Forest Department trekking CCTV camera.

The striped 'Ramling Tiger', captured on a Forest Department trekking CCTV camera.

sakal

Updated on: 

बीड - बीड जिल्ह्यातील आष्टी आणि पाटोदा तालुक्यांमध्ये धुमाकूळ घालणारा आणि आता थेट बीड तालुक्याच्या दिशेने सरकलेला 'रामलिंग वाघ' पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. येडशी रामलिंग अभयारण्यापासून आपल्या प्रवासाची सुरुवात करत गेल्या अडीच वर्षांपासून बीड, धाराशिव, अहिल्यानगर, सोलापूर आणि लातूर या पाच जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात या वाघाने मुक्काम ठोकला आहे.

Loading content, please wait...