Dr. Tanaji Sawant
sakal
- धनंजय शेटे
भूम - राज्याच्या राजकारणात आगामी मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग आला असतानाच धाराशिव जिल्ह्यातही राजकीय उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार तथा माजी मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याच्या चर्चांनी सध्या सोशल मीडियावर जोर धरला आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्याला पुन्हा एकदा मंत्रिपदाचे प्रतिनिधित्व आणि लाल दिवा मिळणार का, असा प्रश्न जिल्हावासीयांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.