पाचवीतील विद्यार्थ्याच्या सतर्कतेमुळे टळली घरफोडी

राजेंद्र भोसले
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

कन्नड, ता. 26 (जि.औरंगाबाद) ः शहरातील कॉलेज रस्ता परिसरात अर्जुन सोनवणे हा मुलगा रविवारी (ता. 25) सायंकाळी घरातून बाहेर खेळायला गेला असता एक अनोळखी व्यक्ती परिसरातील एका घराचे कुलूप तोडत असल्याचे त्याच्या लक्षात आले. शाळेमध्ये दक्षता आणि सुरक्षितता या विषयावर काय करावे याबाबद्दल दिलेली माहिती कामास आली. अर्जुनने घाबरून न जाता घरी येऊन हा प्रकार सांगितला.

अर्जुन व त्याच्या आईने घराबाहेर येऊन मोठमोठ्याने आरडाओरड केली. यामुळे कुलूप तोडून घरात घुसलेला चोर पळून गेला. पाचवीत शिकणाऱ्या अर्जुनच्या सतर्कतेमुळे घरमालकाचे मोठे आर्थिक नुकसान टळले. शाळेत आभ्यासाव्यतिरिक्त शिकविलेल्या इतर कौशल्यांचा व्यवहारातही उपयोग झाला. अर्जुनच्या या बहादुरीबद्दल कृष्णा इंटरनॅशनल शाळेतील शिक्षकांनी त्याचा सत्कार केला. संस्थेचे अध्यक्ष सचिन पवार, प्राचार्या वसुंधरा पवार यांनी अर्जुनचे कौतुक केले. जिल्हा बॅंकेचे अधिकारी विश्वासराव सोनवणे, शिक्षिका राधिका सोनवणे यांचा अर्जुन मुलगा आहे.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Student Alertness Avoid House Breaking