Dharashiv : टॅंकरच्या धडकेत विद्यार्थिनी ठार ; मैत्रीण गंभीर, येणेगूरला संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग रोखला

शाळेत निघालेल्या दोन मुलींना भरधाव टँकरने धडक दिल्याने एका मुलीचा जागीच मृत्यू झाला तर दुसरी गंभीर जखमी झाली आहे. राष्ट्रीय महामार्गावरील येणेगूर (ता. उमरगा) येथे बुधवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले.
Dharashiv
Dharashivsakal

उमरगा, येणेगूर : शाळेत निघालेल्या दोन मुलींना भरधाव टँकरने धडक दिल्याने एका मुलीचा जागीच मृत्यू झाला तर दुसरी गंभीर जखमी झाली आहे. राष्ट्रीय महामार्गावरील येणेगूर (ता. उमरगा) येथे बुधवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. प्रशासनाने मध्यस्थी केल्यावर साडेपाच तासानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

येणेगूर येथील कॅप्टन जोशी विद्यालयातील श्रेया सुरेश पात्रे (सातवी) व तिची मैत्रिण श्रद्धा श्रीकांत कांबळे (सहावी) या नेहमीप्रमाणे रस्त्याच्या कडेने विद्यालयात निघाल्या होत्या. त्यावेळी जनावरे बाजार मैदानासमोर उमरग्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव टँकरने त्यांना धडक दिली. त्यात श्रेया पात्रे हिचा जागीच मृत्यु झाला.

Dharashiv
CM Majhi Shala Abhiyan : राज्यात ‘सुंदर शाळा’ उपक्रमामध्ये छत्रपती संभाजीनगर विभाग प्रथम

श्रद्धा कांबळे ही गंभीर जखमी झाली. ग्रामस्थांनी तिला उमरगा येथील रुग्णालयात पाठवले. तेथून तिला सोलापूरच्या रुग्णालयात हलवण्यात आले. टँकरने एका सायकलस्वारासही धडक दिली. सुदैवाने तो बचावला. टँकरचालकास अडवून ग्रामस्थांनी पोलिसांच्या ताब्यात दिले.

येणेगूर येथील शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थानी महामार्ग रोखून धरला. प्रशासनाच्या नावाने ओरड सुरु केली. ‘आम्हाला न्याय पाहिजे’ म्हणत जिल्हाधिकारी, महामार्गाचा संबंधित ठेकेदार, अधिकारी आल्याशिवाय महामार्ग मोकळा करणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूने सुमारे दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com