ट्रक व दुचाकीच्या धडकेत विद्यार्थिनी ठार

फोटो
फोटो

नांदेड : येथील एका महाविद्यालयात बीसीएसच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या पासदगाव येथील विद्यार्थिनीचा बुधवारी (ता. २२) सकाळी तरोडा नाका परिसरातील मालेगाव रोडवर असलेल्या सरपंचनगर येथे झालेल्या अपघातात ठार झाली.

निकीता नरहरी जाधव (वय २१) रा. पासदगांव (ता. नांदेड) ही आज सकाळी सात ते आठच्या सुमारास  येथील आयटीएम महाविद्यालयात बीसीएच्या द्वीतीय वर्षात शिक्षण घेते. सकाळी महाविद्यालयाला आपल्या स्कुटी (एमएच२६-बीपी-६७५१) वरून जाते वेळेस सरपंचनगर पाटीजवळ आली असता तिच्या स्कुटीला ट्रक (एमएच-२९- झेड ४९२४) ने जोराची धडक दिली. यात निकिता ट्रकच्या मागच्या चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. पोलिस निरिक्षक अनिरूद्ध काकडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. घटना घडल्यानंतर या मार्गावरील वाहतुक बराच वेळ ठप्प होती. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शासकिय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. त्यानंतर दुपारी उत्तरीय तपासणी झालेला मृत्तदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. सायंकाळी निकिताच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी भाग्यनगर पोलिसात रात्री उशिरा ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.  

मोबाईल चोराला अटक 

नांदेड : शहरात मोबाईल चोरांनी हैदोस घातला असून पोलिसांची झोप उडविली आहे. अशाच एका मोबाईल चोराला अटक करून त्याच्याकडून एक लाख रुपयाचे नऊ मोबाईल जप्त केले. ही कारवाई शिवाजीनगर पोलिसांनी मंगळवारी (ता. २२) रात्री केली. 

शहरातील आठवडी बाजार व मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वेस्थानक, चित्रपटगृह आणि गर्दीच्या ठिकाणी या चोरांचा वावर असल्याने मोबाईल चोरीच्या घटनात वाढ झाली आहे. मागील काही दिवसांपासून मोबाईल चोरांच्या वाढत्या घटनामुळे पोलिस यंत्रणा पुरती हतबल झाली होती. परंतु या चोरांना पकडण्यासाठी पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड, उपविभागीय पोलिस अधिकारी (शहर) अभिजीत फस्के यांनी पोलिस निरीक्षक अनंत नरुटे यांना सुचना दिल्या. यावरून श्री. नरुटे यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक रवी वाहूळे यांच्या पथकाला सतर्क केले.

  
आरोपीकडून नऊ मोबाईल जप्त 

या पथकाने मंगळवारी आपल्या हद्दीत गस्त घालत असतांना मगनपूरा रस्त्यावर एक संशयीत त्यांनी ताब्यात घेतला. आकाश आनंदा बादवड (वय १९) रा. दहीकळंबा (ता. कंधार) त्याचे नाव असून तो सध्या विठ्ठलनगर येथे राहतो. पोलिसांनी त्याला सोबत घेऊन त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्याकडून रेडमी कंपनीचे दोन, सॅमसंग कंपनीचे दोन, हॉनर कंपनीचे दोन, ओपो कंपनीचे दोन आणि लावा कंपनीचा एक असे एक लाख ५०० रुपयाचे नऊ मोबाईल जप्त केले. त्याला बुधवारी श्री. वाहूळे यांनी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलिस कोठडीत पाठविले आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस नाईक एल. जे. शेख करीत आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com