अभ्यासमालेमुळे विद्यार्थी आनंदीत, ‘शाळा बंद, शिक्षण आहे’ उपक्रम  

राजेश दारव्हेकर
Tuesday, 7 July 2020

शिक्षण विभागाने राज्यभरातील विद्यार्थ्यांना घरपोच पाठ्यपुस्तके वितरण करण्यात आले. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांच्यामार्फत शैक्षणिक दिनदर्शिका विकसित करण्यात आले असून याच्या आधारे दीक्षा अॅपच्या सहायाने विद्यार्थी स्वयं अभ्यास करू शकतात.

हिंगोली : शाळा बंद असल्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या विविध माध्यमांबाबत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा बंद असल्या तरी मुलांचे शिक्षण थांबू नये, यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून सातत्याने विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. सध्या विद्यार्थ्यांना शाळा बंद, शिक्षण आहे ही अभ्यासमाला शालेय शिक्षण विभागाने सुरू केली आहे.

शिक्षण विभागाने राज्यभरातील विद्यार्थ्यांना घरपोच पाठ्यपुस्तके वितरण करण्यात आले. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांच्यामार्फत शैक्षणिक दिनदर्शिका विकसित करण्यात आले असून याच्या आधारे दीक्षा अॅपच्या सहायाने विद्यार्थी स्वयं अभ्यास करू शकतात. यासोबत आता शाळा बंद शिक्षण आहे, ही अभ्यासमाला सुरू करण्यात आली असून याच्या सहायानेदेखील राज्यातील मुले स्वयं अध्ययन करत आहेत. 

हेही वाचा - कोरोना अपडेट : नांदेडला २१ वा बळी, एकूण बाधित रुग्णांची संख्या ४५८

दररोज सहा तास अध्यापनाच्या तासिका
या सर्व प्रयत्नांना पुढे घेऊन जाताना विद्यार्थ्यांच्या समोर शिक्षणाचे विविध पर्याय उपलब्ध करून देण्याकरीता सद्यस्थितीत जिओ टीव्हीच्या प्लॅटफॉर्मवर इयत्ता बारावी विज्ञान, इयत्ता दहावी (इंग्रजी माध्यम) व इयत्ता दहावी (मराठी माध्यम) यासाठीचे तीन ज्ञानगंगा चॅनेल व जिओ सावन या रेडिओच्या प्लॅटफॉर्मवर ‘आम्ही इंग्रजी शिकतो’ या रेडिओ कार्यक्रमाचे उद्‍घाटन नुकतेच शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या हस्ते ऑनलाइन बैठकीत करण्यात आले. या तीन चॅनेलवरून दररोज सहा तास अध्यापनाच्या तासिका प्रक्षेपित केल्या ज्यातील व त्याच तासिका दिवसातील उर्वरित १८ तास पुनर्प्रक्षेपित केल्या जातील. याचे वेळापत्रक वेळोवेळी www.maa.ac.in या वेबसाइटवर सविस्तर प्रदर्शित केले जाणार आहे.  पालक, विद्यार्थी यांनी जिओ टीव्ही यावर हे चॅनेल पाहण्यासाठी, जिओ मोबाईल क्रमांक व इंटरनेट सुविधा आवश्यक आहे. याकरीता प्ले स्टोअर अथवा माय जिओ ॲपवरून जिओ टीव्ही हे अॅप डाउनलोड करावे. सदर अॅपवर लॉगिन करण्यासाठी आपला जिओ मोबाईल क्रमांक व आलेला ओटीपी टाकुन पर्याय निवडावा. 

हेही वाचा - औरंगाबाद : कोरोनाने घेतला माजी नगरसेवकाचा बळी, तर ग्रामीण भागातील ३७ रूग्णांची वाढ

‘जिओ सावन’ अॅप सर्व स्मार्ट मोबाइलधारकांना 
सदर अॅपवर लॉगिन करण्यासाठी आपला जिओ मोबाईल याचप्रमाणे जिओ सावनवरील रेडीओ कार्यक्रम ऐकण्यासाठी ‘जिओ सावन’ हे रेडियो अॅप सर्व स्मार्ट मोबाइलधारकांना (सर्व मोबाईल नेटवर्क सेवा पुरवठादार) उपलब्ध आहे. यासाठी इंटरनेट सुविधा आवश्यक आहे. याचबरोबर लवकरच इयत्ता दहावी (उर्दू माध्यम), इयत्ता नववी (मराठी माध्यम, इयत्ता नववी (इंग्रजी माध्यम), इयत्ता नववी (उर्दू माध्यम), इयत्ता आठवी (इंग्रजी - मराठी - उर्दू माध्यम), इयत्ता सातवी (इंग्रजी - मराठी - उर्दू माध्यम),  इयत्ता सहावी (इंग्रजी - मराठी - उर्दू माध्यम), इयत्ता तिसरी व चौथी (इंग्रजी - मराठी - उर्दू माध्यम) यासाठी पुढील नऊ चॅनेल लवकरच जिओ टीव्हीवर उपलब्ध होतील.

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी बोलकी पुस्तके उपलब्ध 
जिओ सावनवर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी बोलकी पुस्तकेदेखील उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सद्यस्थितीत सदर जिओ टीव्हीची सुविधा केवळ जिओ सिमकार्डधारक यांच्यासाठी उपलब्ध असली तरी येत्या काही दिवसात सर्व इयत्ताचे, सर्व विषयांचे ई-साहित्य यू.टयूब चॅनेल च्या माध्यमातून सर्व स्मार्ट मोबाइलधारक यांना सर्व माध्यमाचे ई-साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याबाबत सविस्तर सूचना लवकरच आपणास देण्यात येतील. राज्यातील विद्यार्थ्यांची शिक्षण प्रक्रिया सुरू राहण्याच्या दृष्टीने करण्यात येत असलेल्या सुविधेबाबतची आवश्यक ती सर्व माहिती शक्य त्या सर्व माध्यमातून आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यापर्यंत पोहचविण्यात यावी, असेही शिक्षण विभागाने काढलेल्या आदेशात नमूद आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students are happy because of the study series, 'School is closed, education is there' activities, hingoli news