Video: विविध मागण्यांसाठी ‘या’ विद्यापीठात विद्यार्थ्यांचा ठिय्या

कैलास चव्हाण
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना तात्काळ वसतीगृह उपलब्ध करा, विद्यापीठातील सर्व शाखांची वाढवलेले शुल्क कमी करावे, कृषी पदवीत्तर पदवीला पूर्ण व्यावसायिक दर्जा घोषीत करा, कृषी शिक्षण परिक्षांचा निकाल ४५ दिवसाच्या आत लावावा आदीं मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी बुधवारी (ता.पाच) ठिय्या आंदोलन केले.

परभणी : विविध मागण्यांसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर  बुधवारी (ता.पाच) ठिय्या आंदोलन केले. राज्यस्तरावरील मागण्यांसाठी हे आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.

विद्यापीठातील कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना तात्काळ वसतीगृह उपलब्ध करा, विद्यापीठातील सर्व शाखांची वाढवलेले शुल्क कमी करावे, कृषी पदवीत्तर पदवीला पूर्ण व्यावसायिक दर्जा घोषीत करा, कृषी शिक्षण परिक्षांचा निकाल ४५ दिवसाच्या आत लावावा, चौथ्या सत्रातील विद्यार्थ्यांची नियमीत शैक्षणीक सहल काढण्यात यावी, २०१८-१९ या वर्षातील विलंबीत पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता रद्द न करता सर्व विद्यार्थ्यांना अदा करावा, विद्यापीठातील २०१८-१९ या वर्षातील विलंबीत ईबीसी शुल्कशिवाय अदा करावी, अशा विविध २२ मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. आंदोलना दरम्यान, विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने कुलगुरु डॉ. अशोक ढवण यांच्याशी चर्चा केली. 

हेही वाचा - वाचा : का आहेत रब्बी पिके संकटात...

आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्धार
या वेळी विद्यापीठा स्तरावरील मागण्या पूर्ण करण्याचे  लेखी अश्वासन विद्यापीठ प्रशासनाने  दिले आहे. त्यातील अनेक मागण्यांबाबत कार्यवाही सुरु असल्याचे पत्रात नमुद केले आहे. तर उर्वरीत प्रलंबीत मागण्या पूर्ण करण्याची कार्यवाही केली जाईल असे म्हटले आहे. मात्र, राज्य शासनाशी निगडीत असलेल्या मागण्यांबाबत आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्धार व्यक्त करत आंदोलन सुरु ठेवले आहे. आता या मागण्यांसाठी आंदोलन बीएससी कृषी शाखेचे शुल्क कमी करावे, कृषी शाखेच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लागू करावे, कनिष्ठ अभियंता गट ब व जलसंपदा विभागात कृषी अभियांत्रीकीच्या विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणे ५० टक्के जागा द्याव्यात, अशा मागण्या राज्यस्तरावरील आहेत.

विद्यापीठस्तरावरील मागण्या मान्य
विद्यार्थ्यांच्या विद्यापीठस्तरावरील मागण्या मान्य केल्या आहेत. त्यावर कार्यवाही सुरु आहे. ज्या मागण्या राज्य शासनाशी निगडीत आहेत, त्या संदर्भात पत्रव्यवहार सुरु आहे. शासनदेखील सकारात्मक आहे.
- डॉ. अशोक ढवण, कुलगुरु वनामकृवि परभणी
...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The students' demands at this university for various demands