esakal | शैक्षणीक साहित्याच्या बाजारपेठेतील किलबिलाट गायब !
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

दरवर्षी साहित्याची बाजारपेठ गजबजलेली असते. त्यामुळे एकप्रकारे नवचैतण्य आलेले निर्माण होते. यंदा मात्र, कोरोना विषाणुच्या उद्रेकामुळे शाळा सुरु करण्याबाबत अनिश्चिता आहे.

शैक्षणीक साहित्याच्या बाजारपेठेतील किलबिलाट गायब !

sakal_logo
By
कैलास चव्हाण

परभणी : जिल्ह्यात यंदा शाळा सुरु होण्याबाबत अनिश्चीता असल्याने शैक्षणीक साहीत्याने शहरातील गजबजलेल्या बाजारपेठेचा रंग उडाला आहे. विविध रंगाची दप्तरे, वॉटर बॅग, गणवेश आदी साहीत्य खरेदीसाठी कोणीच फिरकत नसल्याने शैक्षणीक साहित्याच्या बाजारात किलबिलाट गायब झाला आहे.
दरवर्षी जून महिण्यात काही दिवस विद्यार्थ्यांना शाळेसह नविन शालेय साहीत्याविषयी कुतुहूल आणि उत्सुकता असते. नवीन गणवेश, दप्तर, वाटरबॅग, वह्या, पुस्तके यांचे खास आकर्षण लहान विद्यार्थ्यांना राहते. त्यामुळे शाळा सुरु होण्याचा आधी आठवडाभरापासून मुले पालकांना भंडावुन सोडतात. दरवर्षी साहित्याची बाजारपेठ गजबजलेली असते. त्यामुळे एकप्रकारे नवचैतण्य आलेले निर्माण होते. यंदा मात्र, कोरोना विषाणुच्या उद्रेकामुळे शाळा सुरु करण्याबाबत अनिश्चिता आहे.

हेही वाचा : पाऊस म्हटला की ‘चातक’ आलाच ! , नेमगिरीत बनले पर्यटकांचे आकर्षण
 


मार्च महिण्यापासून शाळा बंद आहेत. अर्धा जून महिना झाला तरी शाळा सुरु करण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. केवळ शाळेत शिक्षकांना येण्यास सांगीतले आहे. ऑनलाईन पध्दतीने शिक्षण कसे देता येईल यावर विचार सुरु आहे. त्यामुळे शैक्षणीक बाजारपेठ विद्यार्थी, पालकाअभावी ओस पडली आहे. विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात शैक्षणीक साहित्यामध्ये गुंतवणुक केली आहे. आता ते विक्रीच्या प्रतिक्षेत आहेत.

३५० रुपयांपर्यंत खाऊचा डबा
परभणीच्या बाजारपेठेत सध्या विविध आकाराचे वॉटर बॅग व कार्टून्स व डिझाइन्स असलेली कंपास पेटी आली आहे. कंपासपेटी चाळीस ते दोनशे रुपयांपर्यंत, वॉटर बॅगही १५० रुपयांपासून ३०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. खाऊच्या डब्यातही अनेक प्रकार आहेत. प्लॅस्टिक, स्टील तसेच फायबरचे डब्बे आहेत. २३० ते ३५० रुपयांपर्यंत खाऊच्या डब्यांच्या किंमती झाल्या आहेत.

हेही वाचा : या’ जिल्ह्यात वार्षीक सरासरीच्या ९ टक्के पाऊस
 

वॉटर बॅग, दप्तरावर कार्टूनचा बोलबाल
पूर्वी अगदी दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आडवी दप्तरे असायची. महाविद्यालयात केवळ उभी अर्थात सॅक वापरली जात. परंतू, आता अगदी पहिलीपासूनचे विद्यार्थी सॅक वापरत आहेत. विविध डिझायनच्या सॅकला विद्यार्थी पसंती देत असल्याने आडव्या दप्तरे तुरळक दिसत आहेत. वॉटर बॅग, व दप्तरावर यंदाही मिकी माऊस, बार्बी डॉल, अँग्री बर्ड आणि छोटा भीम आणि आता मोटु पतलु या चित्रांचा सर्वाधिक बोलबाला असल्याचे दिसत असून यांची किंमत २५० ते २५०० रुपये इतकी आहे. बाजारपेठ सजली आहे. परंतु खरेदी करण्यास विद्यार्थी नाहीत. अन् पालकही नाहीत.`त्यामुळे बाजारपेठेवर मरगळ आली आहे. जोपर्यंत शाळा सुरु होत नाहीत तो पर्यंत बाजारपेठेत उलाढाल वाढणार नाही.
 

loading image
go to top