esakal | शिक्षणासाठी उभे राहून विद्यार्थ्यांचा बसमध्ये प्रवास, फेऱ्या नसल्याने हाल 
sakal

बोलून बातमी शोधा

PTR

शिक्षणासाठी पाथरीला येणाऱ्या विद्यार्थ्यांना सोनपेठ रस्त्यावरून बस नसल्याने या रस्त्यावरील विद्यार्थ्यांचे हाल होत असून सकाळी एकमेव असलेल्या परळी-सेलू गाडीत विद्यार्थ्यांना मेंढरासारखी कोंबली जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. 

शिक्षणासाठी उभे राहून विद्यार्थ्यांचा बसमध्ये प्रवास, फेऱ्या नसल्याने हाल 

sakal_logo
By
धनंजय देशपांडे

पाथरी ः शिक्षणासाठी पाथरीला येणाऱ्या विद्यार्थ्यांना सोनपेठ रस्त्यावरून बस नसल्याने या रस्त्यावरील विद्यार्थ्यांचे हाल होत असून सकाळी एकमेव असलेल्या परळी-सेलू गाडीत विद्यार्थ्यांना मेंढरासारखी कोंबली जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. 

मुलींसाठी मानव विकासच्या बसेस नाहीत 
पाथरी-सोनपेठ रस्त्यावरील विटा बु, लिंबा, डाकूपिंप्री, तारुगव्हान, बाभळगाव, लोणी बु, टाकळगव्हान तांडा, समर्थ नगर येथील शेकडो मुली व मुले शिक्षणासाठी पाथरीत येतात. गेल्या काही दिवसांपासून आठवी, नववी व दहावीच्या शाळा सुरु झाल्या. शाळा सुरू झाल्या असतानाही मुलींसाठी मानव विकासच्या बसेस सुरू न झाल्याने या मार्गावरील विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. 


हेही वाचा - धर्माबाद नगरपालिकेतील आणखी दोनजण अटक; बनावट कागदपत्रांनी दस्तनोंदणीचे प्रकरण

जीव मुठीत घेऊन विद्यार्थ्यांचा प्रवास 
सकाळी आठ वाजता शाळेची वेळ असून त्या वेळेत या मार्गावरून पोहनेर मार्गे येणारी परळी - सेलू बस आधीच प्रवाशांनी भरली असल्याने विद्यार्थ्यांना उभ्याने प्रवास करावा लागत आहे. या बसमध्ये चालकाची कॅबिन सुद्धा विद्यार्थ्यांनी भरली जात असल्याने या बसमध्ये विद्यार्थी मेंढरासारखी कोंबली जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. परीक्षा तोंडावर असल्याने रोजच्या शाळेला खाडा पडू नये म्हणून विद्यार्थी जीव मुठीत घेऊन प्रवास करीत असल्याचा प्रकार या मार्गावर घडत आहे. या मार्गावर शाळेच्या वेळेत दुसरी बस नसल्याने येथील शाळा आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पाथरीला येणे अडचणीचे ठरू लागले आहे. शेकडो विद्यार्थी असलेल्या या मार्गावर पाथरी आगारातून मानव विकास अथवा इतर गाडी सोडण्याची मागणी पालक वर्गातून होत आहे. दरम्यान शरद आबासाहेब यादव, रामा बाबुराव कड, किरण आसाराम महाडिक, ज्ञानेश्वर तुकाराम धर्मे, आन्सीराम खामकर या पालकांनी आज आगार प्रमुखांची भेट घेऊन निवेदनाद्वारे मानव विकासच्या बसेस सुरू करण्याची मागणी केली. 

हेही वाचा - पाणी वाचविण्यासाठी युवा पिढींनी पुढाकार घ्यावा- जिल्हाधिकारी डॉ. विपीन

बसेस तत्काळ सुरू कराव्यात
शाळा जरी पूर्ण सुरू झाल्या नसल्यातरी आहेत तेव्हढ्या मुलींसाठी तालुक्यातील सर्व रस्त्यावर मानव विकासच्या बसेस तत्काळ सुरू कराव्यात जेणे करून मुलींना त्रास होणार नाही व केवळ बस नसल्याने त्यांचे शिक्षण बंद होईल. 
- रवींद्र धर्मे, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना.  

 
संपादन ः राजन मंगरुळकर