उपविभागीय अधिकाऱ्यांनी दीडशे शिक्षकांना परत पाठविले, का ते वाचा...  

PRB20A01274
PRB20A01274

परभणी : शहरात संचारबंदीत लागू असताना देखील ये-जा करणाऱ्यांची गर्दी काही कमी होताना दिसत नसून त्यांना रोखण्यासाठी मंगळवारी (ता.१४) उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर हे स्वतःच रस्त्यावर उतरले. त्यांनी अनेकांना रोखले तसेच परतीला लावले. 

शहरात व जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप वाढत असून असून दररोज मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. तर गंगाखेड शहर हे कोरोनाचा नवा हॉटस्पॉट ठरले आहे. 

परवाने असतील तरच दिला प्रवेश 
महापालिका हद्दीत (ता.१५) जुलैपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. असे असतानाही शहरात येणाऱ्यांचे व जाणाऱ्यांचे प्रमाण मात्र लक्षणीय आहे. अनधिकृत मार्गाने विनापरवाना शहरात येणाऱ्या रोखण्यासाठी डॉ. संजय कुंडेटकर हे मंगळवारी सकाळीच गंगाखेड रस्त्यावरील टोल नाक्यावर पोहोचले. त्या ठिकाणी पोलिस कर्मचाऱ्यांसह तैनात असलेल्या शिक्षकांच्या मदतीने त्यांनी येणाऱ्या प्रत्येक वाहनांची कसून चौकशी केली. परवाने असतील तर शहरात घेतले नसतील तर अनेकांना परत पाठवले. जड वाहने, चार चाकी, ऑटो रिक्षा, दुचाकी, सायकल अशा वाहनांना ओळखण्यात येत होते. संचारबंदीतही वाहने शहरातून जातातच कशा असा सवाल यानिमित्ताने निर्माण होता आहे. 

जिल्हा परिषद शिक्षकांची घर वापसी 
संचारबंदीच्या काळातही शहरातून मोठ्या संख्येने जिल्हा परिषदेचे शिक्षक त्यांच्या त्यांच्या शाळात पोहोचत आहे. गंगाखेड नाक्यावरून शाळेत जाणाऱ्या दीडशेवर शिक्षकांना डॉ. कुंडेटकर यांनी परत पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली. अनेकांनी मुख्याध्यापकांचे आदेश असल्याचे सांगितले. तसेच काहींनी ध्वनिफीत देखील ऐकून दाखवली. त्यावर डॉ. कुंडेटकर चांगलेच संतापले. त्यांनीही संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करून कानउघडणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

शिक्षकांना परत पाठविले 
शहरात संचारबंदी लागू आहे असे असतानाही विनाकारण अनेक नागरिक जा-ये करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर अनेकांना परत पाठवले. विशेषतः संचारबंदी असतानाही जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक मोठ्या प्रमाणावर जात होते. त्यांना परत पाठवले तर संबंधित अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांच्या आदेशाची जाणीव करून दिली. 
डॉ. संजय कुंडेटकर, उपविभागीय अधिकारी, परभणी. 

(संपादन ः राजन मंगरुळकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com