esakal | उपविभागीय पोलिस अधिकारी १० लाखांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
sakal

बोलून बातमी शोधा

bribe

उपविभागीय पोलिस अधिकारी १० लाखांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

sakal_logo
By
विलास शिंदे

सेलू (परभणी): अपघाताच्या एका प्रकरणात मदत करण्यासाठी दोन कोटींची मागणी केली होती. त्यातील दहा लाखांची रक्कम स्विकारताना मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सेलू येथील उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या अखत्यारित काम करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यास रंगेहाथ शनिवारी ( ता.२४ ) रोजी पहाटेच्या सुमारास पकडले आहे. याप्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाल यांच्यासह दोघांवर सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने देण्यात आलेली माहिती अशी, सेलू पोलिस ठाण्यांतर्गत ३ मे २०२१ रोजी एका अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील मयताच्या पत्नीसोबत तक्रारदाराची मोबाईलवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. ९ जुलै रोजी सेलू येथील उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाल यांनी तक्रारदारास त्यांच्या कार्यालयात बोलून, 'तुझी व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप मी ऐकली आहे. यातून तुला बाहेर पडायचे असेल तर तू मला दोन कोटी रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. तसेच कार्यालयात वारंवार बोलावून व फोन करून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली.

हेही वाचा: जोमात आलेले खरिपाचे पिके पाण्यात; नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी

तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात (ता.२२) जुलै रोजी तक्रार दिली. या तक्रारीनुसार या विभागाच्या अधिकाऱ्यांनी (ता.२३ ) जुलै रोजी तक्रारीची पडताळणी केली. त्यात उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाल यांनी तक्रारदाराकडे गुन्ह्यात मदत करण्यासाठी दोन कोटी रुपयांची मागणी करून तडजोडीत, त्यातील एक कोटी पन्नास लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर काही वेळातच तक्रारदाराच्या भावाकडून उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाल यांच्या कार्यालयाशी संलग्न मानवत पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी गणेश लक्ष्मणराव चव्हाण यांना दहा लाख रुपयांची लाचेची रक्कम स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. याप्रकरणी सेलू येथील पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल व पोलीस कर्मचारी गणेश चव्हाण यांच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे.

loading image
go to top